Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
2 Feb 2026, 10:13 वाजता
‘विलिनीकरणाबाबत माध्यमांशी बोलू नका’,राष्ट्रवादी SP वरिष्ठांकडून नेत्यांना सूचना
NCP : विलीनीकरणाबाबत माध्यमांशी बोलू नका वारिष्ठांकडून नेत्यांना आणि प्रवक्त्यांना सूचना…दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यासाठी झालेल्या बैठकांवर शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे बोलतील इतर कोणीही बोलू नये – पक्षाकडून सूचना…ज्यांना या बैठकांबाबत माहिती नाही त्यांनी जर माध्यमांना प्रतिक्रिया दिली तर चर्चा या वेगळ्या दिशेने जाऊ शकतात त्यामुळे पक्षाने घेतली जबाबदारी…वरिष्ठांच्या परवानगीशिवाय या विषयावर कोणीही बोलू नये नेत्यांना प्रवक्त्यांना सूचना
2 Feb 2026, 09:37 वाजता
‘तमिळांविरोधात बोलाल, मुंबईत लाखांची रॅली’,आमदार तमिळ सेल्वन यांचा ठाकरेंना इशारा
Tamil Selvan : तमिळांविरोधात बोलाल तर मुंबईत एक लाखांची रॅली काढू असा इशारा भाजपचे आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलाय… भगवान मुरुगन यांच्या थैपूसम उत्सवनिमित्त मुंबईत रॅली काढण्यात आली होती.. भाजपचे आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा ते माटुंगा इथल्या मुरुगन मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली. महापालिका निवडणुकांदरम्यान भाजपचे दाक्षिणात्य नेते अण्णामलाई यांच्या मुंबई संदर्भातील विधानावरुन वाद निर्माण झाला होता… त्यानंतर राज ठाकरेंनी अण्णामलाई यांना इशारा दिला होता.. आता तमिळ सेल्वन यांनी 1 लाखांची रॅली काढण्याचा इशारा दिल्यानं हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
2 Feb 2026, 09:10 वाजता
अजितदादांच्या अंत्यविधीवेळी चोरांचा धुमाकूळ
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरटयांनी किमान पंधरा जणांचे पंचवीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा चोरटयांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी 29 जानेवारी रोजी लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरटयांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या पैकी काही चोरटयांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.

2 Feb 2026, 08:44 वाजता
राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाकडून इशारा
Rain alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होतेयं ….. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झालीयं…. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला…. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यतायं…. फेब्रुवारी महिन्यात थंडी फार काही नसणार असल्याचं ही भारतीय हवामान विभागाने म्हटलंय…या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यतायं…
2 Feb 2026, 08:11 वाजता
संबंधित बातम्या
छत्रपती संभाजीनगर महापौरपदाचा मुंबईत निर्णय?
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगरचा महापौर बाबत आज मुंबईत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे..याबाबत आज मुंबईत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव, दोन-तीनवेळा निवडून आलेला, पक्ष संघटनेचा अनुभव, लोकप्रतिनिधींसह केंद्र व राज्य शासनाशी समन्वय ठेवण्यासह निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार महापौरपदावर बसेल असे वरिष्ठ नेते सांगताय… महापौर पदासाठी भाजपने 5 नाव निवडले आहे यातील एक नाव या बैठकीत अंतिम होईल महत्वाचं म्हणजे मंत्री अतुल सावे यांचा निर्णय याबाबत महत्वाचा ठरणार आहे…

2 Feb 2026, 07:34 वाजता
कल्याणमध्ये ठाकरेंचा बेपत्ता नगरसेवक परतला
KDMC : केडीएमसीत शिवसेना BBT पक्षाचे बेपत्ता असलेल्या चार नगरसेवकांपैकी एक नगरसेवक घरी परतला…नगरसेवक मधुर म्हात्रे आखेर 16 दिवसानंतर घरी परतले…कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं..नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे अनेक दिवसापासून नॉट रीचेबल होते.. शिवसेना UBTने नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला होता.. अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वेचे नगरसेवक मधुर म्हात्रे परतले
2 Feb 2026, 07:32 वाजता
मुंबईत सत्तास्थापनेचं सूत्र ठरणार
Mumbai : मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेचे सूत्र ठरणार..महायुती दोन गटात करणार नगरसेवकांची नोंदणी…भाजपचा एक गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नोंदणी करणार…राष्ट्रवादी सोबत आल्याने महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर गेलाय…सकाळी 10 वाजता भाजप – शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेत उपस्थित राहण्याचे निर्देश.. पालिका मुख्यालयात औपचारिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना…कोकण भवनात दोन्ही गट स्वतंत्र नोंदणी करणार




