Devendra Fadnavis: अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
Devendra Fadnavis: अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार करतील. देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाही.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याआधी 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या 7 दिवसांत 22 प्रचारसभा होणार होत्या. एकही सभा न घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. (Devendra Fadnavis will not campaign in the Zilla Parishad elections 2026)
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका- (Zilla Parishad Election 2026)
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये (Zilla Parishad Election Date ) राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या




