टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात

Follow Us:

Tanaji Sawant Vs Ranajagjitsinha Patil : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यावरुन तानाजी सावंत यांनी टीका केली आहे.

धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरुन शिंदेंचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजपच्या आमदारांवर टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं आहे, त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तुळजाभवानी मंदिरातील गाभारा तोडफोड प्रकरणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांना दोषी धरत तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. हाच धागा पकडून आता तानाजी सावंत यांनी भाजपच्या आमदारांवर जोरदार टीका केली.

Tanaji Sawant On Tuljapur : गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग केलं?

तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. त्याच पावित्र्य आपण राखायला हवं. झक मारायची तर बाहेर हात लावायचा, गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग करतो असं म्हणत तानाजी सावंत यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार तानाजी सावंत यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरण आणि मंदिर तोडफोड प्रकरण यावरून भाजप आमदारांवर टीका केली.

Tanaji Sawant Speech : तानाजी सावंतांचा भाजपला इशारा

धाराशिव नगरपरिषदेत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार म्हणत तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाला इशारा दिला. भूम परंडा मतदारसंघात आणलेला निधी एकत्र करा आणि मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल तर राजीनामा देतो असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलं.

काम करूनही दीड हजार मतांनी निवडून येतो ही शोकांतिका आहे असं म्हणत तानाजी सावंत यांनी विधानसभेतील विजयाबाबत खंत व्यक्त केली. गद्दारी केली तर ठेचून काढणार अशा शब्दात तानाजी सावंत यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करणाऱ्यांना आम्ही मानत नाही असं ते म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 19th April 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींना होणार मोठा फायदा, तुमची रास आहे का त्यात ?

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट बॉम्ब..

खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ

फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना