टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

Follow Us:

छत्रपती संभाजी नगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भरधाव दुचाकी धडकली, या दुचाकीवरुन तीन जण प्रवास करत होते.

बुलढाणा : रस्ते महामार्गावरील अपघातांच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. आता, बुलढाणा-छत्रपती (Buldhana) संभाजी नगर महामार्गावरील धाड गावाजवळ जवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला असून अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. तर, स्थानिकांना धाव घेत रुग्णवाहिकेलाही पाचारण केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती संभाजी नगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भरधाव दुचाकी धडकली, या दुचाकीवरुन तीन जण प्रवास करत होते. धाड गावाजवळ या दुचाकीने बसला जोराची धडक दिल्याने टु व्हिलरवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले, रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. मात्र, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही तरुण 20 वर्षे वयाच्या आतीलच असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, तर अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 19th April 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींना होणार मोठा फायदा, तुमची रास आहे का त्यात ?

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट बॉम्ब..

खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ

फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना