-
प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत
प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत आहेत. प्रशांत जगताप यांचा पक्षासमोर प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार… अशी जगताप यांची भूमिका आहे. प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार आहे.
-
राज्यभरातील निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक मुंबईत दाखल
आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दुपारनंतर सर्व नगराध्यक्ष एकनाथ शिंदेंसोबत वंदन करणार. यानंतर दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात त्यांचा सत्कार होणार आहे.

-
ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे – संजय राऊत
ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे… जागावाटपात आमच्यात कुठेही रस्सीखेच नाही… काल रात्री जागावाटप पूर्ण झालंय… दोन्ही पक्षनेते जागांचा फॉर्म्युला सांगतील… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग
दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी केली चर्चा. महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी मधील नेते सकारात्मक
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार
मोहोळच्या 22 वर्षीय तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार. मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारत नगराध्यक्षपदी विजय मिळवला

-
भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला
भोकरदन तालुक्यात रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी गाय गोठे वृक्ष लागवड आणि सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला आहे मात्र ही कामे सुरू असून सुद्धा पंचायत समिती प्रशासनाकडून मस्टर काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान मागील आठवड्यात याच शेतकरी पुत्रांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कडाक्याच्या थंडीत उपोषण केलं.
-
शेतकऱ्याची किडनी काढण्यावरून मोठी खळबळ
किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची दिली होती तक्रार.
-
अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार.
-
बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार
11 वीच्या विद्यार्थ्याला स्टम्पने चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून जबरी मारहाण केलीय. प्रसिक बनसोडे असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तब्बल तीन तास मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्याचा आरोप. रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने केली मारहाण. दारूच्या नशेत मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांचा आरोप. दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.
-
पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग
पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी चर्चा केली.
-
काँग्रेसचा प्लॅन बी तयार, अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याची काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम
आज पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असली तरी अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम आहे. काल शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घरी युतीसाठी चौथी बैठक झाली पण, ही बैठक ही निष्फळ ठरली.
-
नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का
नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का बसला आहे. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपात प्रवेश केला. बबलू शेलार हे शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत.गजानन शेलार मात्र या प्रवेशा बाबत बोलण्यास तयार नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.















