टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

संजय काशीद-पाटील गुरुजी यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक श्री.संजय नारायण काशीद-पाटील गुरुजी यांचा काल मंगळवार दि.9 डिसेंबर रोजी शॉक लागून मृत्यू झाला. निधनासमयी त्यांचे वय 49 वर्षे होते.

त्यांच्या पार्थिवावर काल मंगळवारी रात्री उशिरा सोनंद येथे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिक्षक बांधव, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, इंजिनिअर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय नारायण काशीद हे दि. 09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजणेचे सुमारास सोनंद ता.सांगोला येथील त्यांचे शेतातील विहीरीवर मोटार चालु करण्यासाठी गेले असता इलेक्ट्रीक शॉक लागल्याने उपचाराकरिता ग्रामीण रूग्णालय सांगोला येथे दाखल केले असता त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची फिर्याद सुभाष काशीद यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. अकस्मित मयत म्हणून सांगोला पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना गवळी हे करीत आहेत.

श्री.संजय काशीद-पाटील गुरुजी हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वाडी (कडलास) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय तसेच अतिशय मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते. तसेच सामाजिक कार्यात नेहमी हिरारीने त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या अकाली निधनाने सोनंद सह सांगोला तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी गुरुवार दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सोनंद येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितलेे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !