Joe Root Century Record: कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. हा विक्रम मोडून काढण्यासाठी जो रूटला आणखी किती शतकं करावी लागणार आहेत?
-
1/6इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने प्रत्येक देशात जाऊन शतक झळकावलं आहे. पण ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला एकही शतक झळकावता आलं नव्हतं. (फोटो- एक्स)
2/6अखेर अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावलं आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना १२ वर्षांनंतर पहिलं शतक झळकावलं आहे. (फोटो- एक्स)
-
3/6हे जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले. त्यामुळे जो रूटला सचिनचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. (फोटो- एक्स)
-
संबंधित बातम्या
हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल
RBI Repo Rate: आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा EMI कमी होणार
मोबाईल चार्जरवर दिलेल्या ‘या’ अंकांचा नेमका अर्थ काय, तुम्ही वापरत असलेला चार्जर खरंच सुरक्षित आहे का?
तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…
Gold Silver Rate in Mumbai : आनंदाची बातमी… लग्नसराईच्या दिवसांत चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! सोन्याच्या दरात मोठे उलटफेर4/6भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५१ शतकं झळकावण्याची नोंद आहे. (फोटो- एक्स)
-
5/6जो रूटला सचिनच्या या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी आणखी ११ शतकं झळकवायची आहेत. (फोटो- एक्स)
-
6/6तर हा विक्रम मोडून ऑल टाईम ग्रेट फलंदाज बनण्यासाठी त्याला १२ शतकं करावी लागणार आहेत. दरम्यान रूट हा विक्रम मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो- एक्स)



