Shreyas Iyer : मोटरसायकल रेसिंगच्या विश्वातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. स्वीस मोटो 3 रायडर नोआ डेटविलरला भयानक अपघाताचा सामना करावा लागला.
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला नुकताच एका गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना त्याच्या स्पिलिनला मार लागला. त्यामुळे त्याला सिडनीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरुवातीला अय्यरला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. आता तो ICU मधून बाहेर आलाय. त्याची हालत स्थिर आहे. क्रिकेटच्या मैदानावर ही घटना घडली. मोटरसायकल रेसिंगच्या दुनियेतही अशीच दुर्घटना घडली आहे. एका युवा खेळाडूला स्पिलिनच्या दुखापतीसह अन्य इंजरीचा सामना करावा लागतोय.
मोटरसायकल रेसिंगच्या विश्वातूनही अशीच एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. स्वीस मोटो 3 रायडर नोआ डेटविलरचा सेपांग इंटरनॅशनल सर्किट 2025 मध्ये मलेशिया मोटरसायकल ग्रां प्री मध्ये (मोटोजीपी) भयानक अपघात झाला. रविवारी प्रॅक्टिस सेशन दरम्यान ही दुर्घटना घडलेली. सीआयपी ग्रीन पावरचा डेटविलर ट्रॅकवर धीम्या गतीने गाडी चालवत होता, त्याचवेळी मोटो 3 चॅम्पियन जोस एंटोनियो रुएडाने मागच्याबाजूने धडक दिली. त्यानंतर दोन्ही रायडर जमिनीवर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. मेडिकल टीमने तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
कार्डियक अरेस्टमुळे त्याची प्रकृती खूपच नाजूक
मिडिया रिपोर्ट्सनुसार डेटविलरची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. स्पिलिनलाही मार लागलाय. फुफ्फुसांनाही दुखापत झालीय. त्यामुळे अपघातानंतर त्याला अनेकदा ह्दयविकाराचा झटका आला. कार्डियक अरेस्टमुळे त्याची प्रकृती खूपच नाजूक बनली आहे. डेटविलर आयसीयूमध्ये आहे. त्याला वाचवण्याचे डॉक्टर सर्व प्रयत्न करत आहेत असं मोटो 3 ने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
फ्रेंच सीआयपी-केटीएमने डेटविलरच्या दुखापतीवर अपडेट देताना लिहिलं की, “आमचा रायडर नोहा डेविलरचा एक गंभीर अपघात झाला. त्याला कुआलालंपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तो सुरक्षित हातांमध्ये आहे. त्याच्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची आपल्याला विनंती करतो. या प्रसंगी यापेक्षा अधिक माहिती शेअर करणार नाही. नोहा एक योद्धा आहे. संपूर्ण ग्रीन पावर टीम त्याच्यासोबत आहे. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देऊ”




