टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MPSC Exam Schedule: २०२६ च्या एमपीएससी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Follow Us:

MPSC Exam Time Table 2026: एमपीएससीने २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्र वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचे निकाल ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये होईल, तर निकाल २०२७ मध्ये जाहीर होईल. शिक्षक भरतीसाठी सीटीईटी २०२६ ची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल.

MPSC Time Table 2025-26: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पुढील वर्षी (२०२६) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. तर १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. या तिन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध होईल. १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे, तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी घेण्यात येईल. दोन्ही निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. तसेच ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ होऊन फेब्रुवारी २०२७मध्ये निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. १५ नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२६, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल मार्च २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे.

२१ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२६, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे, तर निकाल मार्च २०२७मध्ये जाहीर केला जाणार आहे. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार आहे, असे ‘एमपीएससी’कडून सांगण्यात आले.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 19th April 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींना होणार मोठा फायदा, तुमची रास आहे का त्यात ?

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट बॉम्ब..

खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ

फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना