साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

जागतिक वारसास्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. श्रावण सरी कोसलळ्यानंतर येथील पठारावर विविध रंगबेरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येत आहे.

1/8

2/8
सातारा-पश्‍चिम घाटातील जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात या कास पठारावर आढळते. ऑगस्ट महिन्यापासून या कास पठारावरील फुलांचा बहर पहायला मिळतो.

3/8
मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी हे कास पठार फुलायला सुरुवात झाली आहे.

4/8
महत्वाच्या 132 फुलांच्या जातींपैकी  तेरडा, सीतेची असवे, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागली आहेत.

5/8
संपूर्ण पठार फुलांनी अच्छादण्यासाठी अद्यापही थोड्या दिवसांचा अवधी असणार आहे. यावर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनामार्फत आगळ वेगळं आकर्षण ठेवण्यात आलं आहे.

6/8
यंदा कास पठारवर येणाऱ्या पर्यटकांना बैलगाडी सफर करण्याचा आनंद घेता येणार आहे, यामधून पर्यटकांना कुमोदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येईल.

7/8
आधीच रंगबेरंगी फुलांनी सजलेल्या कास पठारावर बागडणाऱ्या फुलपाखरांना पाहून हे निसर्ग सौंदर्य आणखी खुललं आहे. त्यामुळे, कास पठाराच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon