टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Malegaon Blast Case Verdict : कुठलेही ठोस पुरावे नाहीत, सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा निकाल

Malegaon Bomb Blast Case Verdict Bombay High Court : अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर 17 वर्षांनी आज, गुरुवारी जाहीर झाला.

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील Malegaon Bomb Blast प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही आरोपींची सुटका झाली आहे. निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांनीच 17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. समीर कुलकर्णींना कोर्टातच अश्रू अनावर झाले.

Malegaon Bomb Blast आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, बॉम्बे हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टातील अपिले, तपास संस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या यासारख्या विविध कारणांमुळे दीर्घकाळ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर 17 वर्षांनी आज, गुरुवारी जाहीर झाला.

कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलं?

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने काश्मीरमधून आरडीएक्स आणले आणि त्याने त्याच्या घरी बॉम्ब तयार केला, याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर हिच्याकडे त्या मोटारसायकलचा त्यावेळी ताबा होता, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही. तो बॉम्ब त्या मोटारसायकलमध्येच लावलेला होता, असेही निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेले नाही. याशिवाय Malegaon Bomb Blast घडवण्यासाठी बैठका झाल्या ते देखील सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले.

कधी झाला होता बॉम्बस्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी रमझान महिन्यातच, मालेगावमधील मशिदीजवळ एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट होऊन हाहाकार उडाला होता. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 101 जण जखमी झाले होते.

2008 साली झालेल्या Malegaon Bomb Blast Case Verdict पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. बॉम्बस्फोट झालेल्या भिकू चौक येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असताना स्फोटामुळे हादरलेली दुकानं, त्यांच्या खुणा अजूनही तशाच असल्याचे चित्र आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती