Chicken Sandwich Recipe: नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग विकेंडला नाश्त्यासाठी (Weekend Breakfast Recipe) चिकन सँडविच हा पर्याय परफेक्ट ठरेल.
Kitchen Hacks Chicken Sandwich Recipe: विकेंडला काही तरी छान खावेसे वाटते. नेहमीच नाश्ता करून विकेंडला कंटाळा येतो. विकेंडला सकाळी काहीतरी झटपट तयार होणारं आणि टेस्टी, पोटभरीचं असं खायचं असेल तर चिकन सँडविच हा पर्याय परफेक्ट ठरतो. प्रोटीनअसलेले चिकन, थोडंसं चीज आणि ताज्या भाज्या यामुळे हे सँडविच फार टेस्टी लागते. हे सँडविच फक्त १०-१५ मिनिटांत तयार होतं आणि दिवसाची सुरुवात छान करते. हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग, पाहूया ही झटपट आणि चविष्ट चिकन सँडविच रेसिपी….
चिकन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
- उकडलेले किंवा शिजवलेले चिकन – १ कप (बारीक चिरलेले किंवा किसलेले)
- ब्रेड स्लाइस – ४
- मेयोनीज – २ टेबलस्पून
- मस्टर्ड सॉस (ऐच्छिक) – १ टीस्पून
- कांदा – १ (बारीक चिरलेला)
- टोमॅटो – १ (पातळ चकत्या कापलेल्या)
- कोबी किंवा लेट्यूस – काही पाने
- बटर – १ टेबलस्पून
- मिरीपूड – ½ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- चीज स्लाइस – २ (ऐच्छिक)
कसे बनवायचे सँडविच? (Steps)
आधीपासून शिजवलेले चिकन थोडेसे बारीक चिरा किंवा किसून घ्या.
एका बाउलमध्ये चिकन, मेयोनीज, चिरलेला कांदा, मीठ आणि मिरीपूड घालून चांगले एकत्र करा. हवे असल्यास थोडासा मस्टर्ड सॉस घालू शकता.
आता पुढे ब्रेड स्लाइसवर दोन्ही बाजूंनी बटर लावा.
एका स्लाइसवर चिकन मिश्रण पसरवा.
त्यावर टोमॅटोच्या चकत्या, कोबी/लेट्यूसची पाने आणि चीज स्लाइस ठेवा.
दुसरी ब्रेड स्लाइस त्यावर ठेवून सँडविच तयार करा.
आता या सँडविचला आपण टोस्ट करणार आहोत. टोस्टर, सँडविच मेकर किंवा तवा गरम करून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत टोस्ट करा.
तव्यावर करत असाल, तर झाकण ठेवून मंद आचेवर टोस्ट करा जेणेकरून चीज छान मेल्ट होईल.
गरमागरम सँडविच छान कट करून सॉस किंवा केचपसोबत सर्व्ह करा. सोबत ज्यूस किंवा चहा सर्व्ह करू शकता.
हे ही वाचा
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! लोनचा EMI कमी होणार; RBI कडून सलग तिसऱ्यांदा दिलासा