Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
हिंदू समाजाचे अपेक्षित काम सरकार करणार- ना.नितेश राणे
सांगोला येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):- हिंदू राष्ट्रामध्ये आम्हा हिंदू लोकांना विरोध करण्याची कोणाचीही ताकद नाही. हिंदू समाजाला जे अपेक्षित काम आहे ते हिंदुत्ववादी विचाराचे सरकार म्हणून आमचे सरकार करणार आहे.सभागृह म्हणजे हिंदु समाजाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा विषय आहे. आज सभागृहाच्या भूमीपूजनासाठी जसे आम्ही सगळे एकत्र आलो त्याचप्रमाणे लवकरच भगव्या उद्घाटनासाठी आम्ही सगळेजण एकत्र येणार असून माझे सल्ले त्यांच्या हिताचेच असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार श्री.सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.चेतनसिंह केदार, हिंदू जागरण मंचाचे जिल्हा संघटक देवभाऊ कोकाटे, अमरदादा लोखंडे, तुकाराम गुळमिरे, शिवाजीअण्णा गायकवाड, महेश गुळमिरे, आनंदकाका घोंगडे, चंदन होनराव, संजय कोठावळे, मनोज उकळे, संदेश पलसे, दिपक खटकाळे,अरविंद केदार, उत्तम ढोले, जगदीश बाबर, मानस कमलापूरकर, अॅड.सरगर, शेखर चाळशी, किरण बुर्ले, आकाश घोंगडे यांच्यासह लिंगायत समाज बांधव,हिंदू बांधव तसेच अक्कमहादेवी महिला संघटनेच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन पुजेचा मान सौ व श्री.राहुल पाटणे यांना मिळाला.
उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. यावर बोलताना ना.नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे, टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही त्यामुळे ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य असेल असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांच्यासाठी ऑपरेशन टायगरचे नाव बदलून ऑपरेशन पेंग्विन हे नाव ठेवण्याचा अप्रत्यक्षपणे सल्ला मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे लवकरच होणार:- आ.बाबासाहेब देशमुख
सांगोला (प्रतिनिधी);- सांगोला तालुक्यातील एकूण जलसंपदा विभागाकडील प्रकल्प संख्या व सिंचन क्षेत्रांची गरज व येथील जलसंपदा विभागांशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे आणि स्थानिक पातळीवर जलसंपदा प्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे, यासाठी सांगोला येथे जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पत्राद्वारे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेली असून लवकरच क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
सध्या या क्षेत्रातील नागरिकांना आणि शेतकर्यांना प्रशासकीय कामांसाठी दूरवरच्या कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात झाल्याने जलसंपदा प्रकल्पांचे स्थानिक पातळीवर नियोजन आणि अंमलबजावणी करणे तसेच सिंचन, पाणीपुरवठा यासंबंधी तक्रारींचे जलद निराकरण करणे तसेच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना तांत्रिक व प्रशासकीय सहाय्य त्वरित उपलब्ध होणार आहे. सांगोला तालुक्यात 20 को.प बंधारे व 14 लघु पाटबंधारे तलाव आहे. या प्रकल्पांचे देखभाल दुरुस्ती व सिंचन व्यवस्थापनाचे कामकाज करणे यामुळे सोयीचे होणार आहे.
या अनुषंगाने सांगोला येथील जलसंपदा विभागाचे विभागीय कार्यालय होणे या आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची त्वरित दखल घेवून जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागास सूचना देत लवकरात लवकर क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे सूरू करण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.मंत्री महोदयांनी तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिल्याने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.
सांगोला नगरपरिषदेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
सांगोला (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला नगरपरिषदेमार्फत तालुका क्रिडा संकुल येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांगोला विधानसभा सदस्य आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व लावण्यात आलेल्या रोपांची जबाबदारीने जोपासना करावी सुचित केले.तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमास फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी श्री.सचिन पाडे, श्री.रोहीत गाडे, श्री.विनोद सर्वगोड , श्रीम. प्रियांका पाटील, श्रीम.अस्मिता निकम, श्री.महेश रजपूत, श्री.करण सरोदे, श्री.प्रभाकर कांबळे, श्री. योगेश गंगाधरे व इतर कर्मचारी वर्ग यांनाही वृक्षारोपण केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.आरिफ मुलाणी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आणून सहभाग नोंदवला. ही रोपे शाळेच्या परिसरात लावून परिसराचे हरितीकरण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,पर्यवेक्षिका कु. सुकेशनी नागटिळक,विभाग प्रमुख कु. भाटेकर,कु.पल्लवी थोरात तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी पालकांनीही सक्रीय सहभाग घेतला. पालकांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ‘इको क्लब’ ची स्थापना करण्यात आली.
इको क्लबसाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आणि समज विकसित केला जाणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. शिल्पा ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सांगोला पोलिस स्टेशनला बदलून आले 31 पोलिस कर्मचारी तर केवळ 8 कर्मचार्यांच्या बदल्या
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला सांगोला पोलिस स्टेशनला पाच वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या केवळ 8 पोलिस कर्मचार्यांच्या जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशनला बदली झाल्या आहेत, तर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला 5 वर्षे सेवा पूर्ण झालेले तसेच विनंती बदलीने असे एकूण सुमारे 31 पोलिस कर्मचारी सांगोला पोलिस स्टेशनला बदलून आले आहेत.
सांगोला पोलिस स्टेशनचे पो.हे.हनुमंत माळी यांची सोलापूर तालुका, पो. हे. अभिजीत मोहोळकर (करमाळा), पो.हे. धनंजय आवताडे (मंगळवेढा), पो.ना.कृष्णा पखाले व इम्रान तांबोळी (पंढरपुर शहर), पो. कॉ. गणेश कुलकर्णी (पंढरपूर तालुका), पो. कॉ. संभाजी शिंदे (पंढरपूर मंदिर समिती), पो. ह. प्रशांत गायकवाड (माढा) याठिकाणी बदली झाली आहे. महिला पो. शि. हर्षा बनसोडे यांना एक वर्षाकरिता सांगोला पोलिस स्टेशनला मुदतवाढ मिळाली. तसेच पो.कॉ.अमोल वाडकर, उमेश डोळस, दीपक लेंगरे, बंड बनकर, अनिल येडगे व संतोष इंगोले, संकेत गोरे, धनंजय जाधव, मच्छिंद्र राजगे, ताजुद्दीन मुजावर, सर्जेराव वाघमोडे, सतीश धुमाळ, शिवाप्पा बिराजदार, दीपक शिंदे, स्वप्नील पवार, शिवाजी आवटे, सोमनाथ भोसले यांची सांगोला पोलिस स्टेशनला बदली झाली. विनंती बदलीनुसार विशाल घाडगे, मच्छिंद्र माळी, सुनील मंडले, धीरज कुमार लवटे, नीलेश ढोबळे, रितेश इंगळे, अशोक मासाळ, काशिनाथ कोळी, सैफन पठाण, किरण राऊत, सहायक फौजदार अनिल गडदे, सहायक फौजदार संजय राऊत, संभाजी आगलावे असे एकूण 30 पोलिस कर्मचारी सांगोला पोलिस स्टेशनला बदलून आले आहेत
सांगोला फॅबटेक मधील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची हैद्राबाद इंडस्ट्रीलला भेट
सांगोला (प्रतिनिधी):- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची हैद्राबाद येथील व्हेक्टर इंडिया कंपनीला सदिच्छा भेट दिली.
कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील 45 हून अधिक विद्यार्थ्यांची इंडस्ट्रील भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हैद्राबाद येथील व्हेक्टर इंडिया या कंपनीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कर्मचार्यांकडून माहिती जाणून घेतली. यादरम्यान इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्या नॅशनल रिमोट सेनसिंग सेंटर ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
ही भेट यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. तानाजी धायगुडे, प्रा.अभिमान होकंळस, प्रा. अतिश जाधव, प्रा.माधुरी सुरवसे, प्रा.कोमल मस्के, प्रा.ज्योती कराडे, सचिन गडहिरे आदींसह कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कवठेमहांकाळ येथे होणार्या शेकाप विभागीय मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे-आ.बाबासाहेब देशमुख
सांगोला (प्रतिनिधी):- शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा शनिवार दिनांक 7/6/2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत कवठेमहांकाळ येथे नवीन एस. टी .स्टॅन्ड.जवळ आयोजीत करण्यात आलेला असुन या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
या मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे सर चिटणिस भाई जयंत पाटील, मा.आमदार भाई बाळाराम पाटील, भाई संपत बापु पवार-पाटील सौ.मानसीताई म्हात्रे, भाई एस.व्ही.जाधव, अड.भाई राजेंद्र कोरडे, भाई.बाळासाहेब लगारे, भाई अनिकेत देशमुख यांच्या सहित अनेक मांन्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळाव्यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वपुर्ण विषयावरची चर्चा होणार असुन त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग व इतर महामार्गासाठी सक्तीने भु-संपादन करण्याच्या विरोधात व त्या बाधीत शेतकर्यांना न्याय देण्यासाठीच्या लढा उभा करणे.त्याचबरोबर गायरान जमीनीवरील अनेक दिवसांपासुन वास्तव्य करणार्या कुटुंबांना त्या जागा कायमच्या त्या कुटुंबांच्या गनावावर कराव्यात तसेच राज्यातील शेतकर्यांना कर्जमुक्ती द्यावी व शेतकर्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीवर चर्चा होणार आसुन महिलांच्या सुरक्षे बरोबर महिलांचे सक्षमी करणावर भर द्यावा त्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच बेरोजगारी व नोकर भरती उठवावी त्याचबरोबर शेतकर्यांना 24 तास विज द्यावी व सध्या जे घरगुती स्मार्ट प्रिपेड मिटर बसवण्याचे काम सुरु आहे तसे मिटर बसवण्यास लोकांचा विरोध असताना अशा मीटर सक्ती विरोधात आवाज उठवणे व महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणे आशा अनेक विषयावरती विचार मंथन करुन आवाज उठविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले असल्याची माहीती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.
रोटरी क्लब सांगोला मार्फत अन्न नासाडी टाळण्यासाठी जागृती फलक
सांगोला (प्रतिनिधी):- अनेक शुभकार्यात आपणास असे आढळते की बरेच जण ताटातील अन्न पूर्ण न संपवतात वाया घालवतात.आपल्या येथे बर्याच जणांना अन्नाची गरज असताना अन्न मिळत नाही त्यामुळे अशा पद्धतीने अन्न वाया जाणे हे चुकीचे आहे.हा विषय लक्षात घेऊन रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल येथे अन्न वाया घालवू नका अशा आशयाचे जनजागृती फलक लोकांच्या नजरेत येतील अशा पद्धतीने लावण्यात आले. या फलकाद्वारे काही प्रमाणात तरी अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. रोटरी क्लब सांगोला ही संस्था नेहमीच विविध जनजागृती पर विषयावर कार्य करण्यात आघाडीवर असते.या कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांच्या पुढाकारातून क्लब मार्फत शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल हे येथे फलक लावण्यात आले.
या कार्यक्रमासाठी हॉल चे मालक शांताराम सुरवसे यांनी सहकार्य करून अशा चांगल्या उपक्रमास प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य रो.इंजि.विलास बिले, रो.शरणाप्पा हल्लिसागर, रो.अरविंद डोंबे व इतर नागरिक हजर होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला आगारात वृक्षारोपण
सांगोला:-5 जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला आगारात वृक्षारोपण कार्यक्रम राबवून विविध प्रकारची 90 झाडे सांगोला आगार परिसरात लावण्यात आली,
यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक श्री. विकास पोपळे, वन अधिकारी श्री.कोंडे, इंगवले मॅडम, कार्यशाळा अधीक्षक श्री पारसे, वाहतूक निरीक्षक श्री.कदम, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी 18 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार
सांगोला : प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर 16 जून रोजी शाळेची घंटा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुमारे 384 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सुमारे 18,500 विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्ससह मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्याचबरोबर खासगी अनुदानित 78 शाळेच्या तुकड्यातील विद्यार्थी संख्येनुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सांगोला तालुक्यातील एकूण 462 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे 2 लाख 3 हजार 305 पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. त्यापैकी 1 लाख 86 हजार 14 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. प्राप्त पाठ्यपुस्तके तालुक्यातील 384 शाळांतर्गत केंद्रनिहाय पोहोच केली असून तेथून प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थी संख्येनुसार वाटप करण्यात येणार आहेत. तसेच खासगी अनुदानित 78 शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येणार आहेत.
यंदा शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला त्यांच्या निवडीनुसार शाळा स्तरावर गणवेश वाटप करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, सॉक्स देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.