maharashtrapoliticalsolapurtop news

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? महायुतीमधील शीतयुद्ध संपुष्टात? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर

प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचे गुर्‍हाळ चांगलेच लांबले. मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आला. आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. एकाच जिल्ह्यात दोघा-तिघांनी दावे ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे. पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण-कोण?

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रजासत्ताक दिनाआधीच पेच सुटणार?

पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे. तर जवळपास 80 टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचे समोर येत आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे दिसते.

रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेंच आहे. तर मुंबई शहर व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे. गडचिरोली आणि सध्या गाजत असलेल्या बीडचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. त्यातच पालकमंत्री पदाची एक संभाव्य यादी चर्चेत आली आहे. कोण-कोण आहे या यादीत?

पालकमंत्र्यांची संभाव्य यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

अकोला – आकाश फुंडकर

धुळे – जयकुमार रावल

लातूर – गिरीष महाजन

मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार

नंदुरबार – अशोक वुईके

पालघर – गणेश नाईक

सिंधुदुर्ग- नितेश राणे

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर

ठाणे – एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे

जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे

यवतमाळ – संजय राठोड

हिंगोली – आशिष जैस्वाल

मुंबई शहर – प्रताप सरनाईक

नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम

रत्नागिरी – उदय सामंत

पुणे – अजित पवार

बीड – अजित पवार

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.

भंडारा – मकरंद पाटील

चंद्रपूर नरहरी झिरवळ

Related Articles

Back to top button