टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

नऊ वर्षानंतर एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस, आषाढी वारीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी नव्या लालपरीतून सुखद प्रवास

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी सुखद ठरणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने नवीन बसेस घेतल्या आहेत. या बसेसमधून आषाढी वारीचा प्रवास भाविकांना करता येणार आहे. तब्बल नऊ वर्षानंतर नवीन बसेसची खरेदी महामंडळाने केली आहे.

गाव तेथे एसटी असे घोषवाक्य असलेली लालपरी गावागावात धावत असते. राज्यभरातील प्रवाशांसाठी लालपरी प्रवासाचे सर्वात महत्वाचे साधन आहे. गेली अनेक वर्ष एसटीच्या ताफ्यात नवीन बसेसचा समावेश केला गेला नव्हता. परंतु आता राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार नवीन बसेसची खरेदी केली आहे. आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे. राज्यभरातून वारीसाठी दोन हजार बस धावणार आहेत. यामुळे वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लालपरीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे.

२०१६ नंतर बसेसची खरेदी

काही वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. मात्र, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता. गेल्या काही वर्षांत आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवासाचा सुखद अनुभव येत नव्हता. मागील वर्षी पुणे विभागातून आषाढी वारीसाठी पुण्यातून पंढरपूरसाठी ३८० बस सोडण्यात आल्या. या सर्व बस जुन्या होत्या. परंतु आता नवीन बसेसची खरेदी झाली आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे.

यंदा राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या आहेत. पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत दीड हजार बस दाखल झाल्या आहेत. तसेच पुढील एक महिन्यात आणखी एक हजार बसेस येणार आहे.

नवीन बसेसमध्ये अनेक सुविधा

एसटी महामंडळाने तीन हजार नवीन बसेस घेतल्या आहे. या बसेस अत्याधुनिक आहेत. यामध्ये अनेक सुविधांचा समावेश केला आहे. तीन बाय दोन या पद्धतीने या बसेसची बांधणी करण्यात आली आहे. या बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन, कॅमेरे, चार्जिंग पोर्ट्स दिले आहे. तसेच बसमध्ये काही बिघाड झाला तर ते शोधण्यासाठी संगणक प्रणाली आहे. या बसेस चेसिसवर न बांधता आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती