टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ajit Pawar: ‘पवार साहेबांनी ठणकावून सांगितलं…’, अजित पवारांनी सांगितला शरद पवारांचा “तो” किस्सा, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar: जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे, म्हणून राजकारणात हे आरक्षण आणलं असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवारांबाबतचा महिला आरक्षण देतानाचा एक किस्सा सांगितला आहे. अजित पवार म्हणाले, महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आपण दिलं आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे, म्हणून राजकारणात हे आरक्षण आणलं असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं, पवारसाहेबांनी सांगितलं होतं की, हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील. मला आठवत आहे की, सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतलं. साहेबांनी ठणकावून सांगितलं की, आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पास झालं होतं. असा महिला आरक्षण बिल पास करतानाचा किस्सा अजित पवारांनी सांगितला आहे.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, आज मुली सगळीकडे पुढं जात आहेत. मुली फक्त अभ्यासातच लक्ष देतात त्या मुलांसारखं इकडे तिकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे ज्या देशात महिलांना सन्मान दिला जातो ते देश पुढे आहेत. जिथं महिलांना सन्मान दिला जात नाही तो देश मागासलेला असतो. मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे. आता भिडे वाडा सरकारने ताब्यात घेतला आहे. तिथं पहिली मुलींची शाळा सुरू झाली, होती तिथं काम आता सुरू केलं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा उल्लेख

पहेलगाममध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं, पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती, आणि त्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं. आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो
त्याही वेळी दोन महिला अधिकाऱ्यांनी मिडिया समोर येऊन माहिती दिली. विंग कमांडर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह अशी त्यांची नावं आहेत. काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली हे चुकीचं आहे, आम्हाला याचं वाईट वाटतं असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Operation Sindoor : ओवैसी, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी ते श्रीकांत शिंदेंपर्यंत; ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशोगाथा ‘खासदारांची टीम इंडिया’ अवघ्या जगाला सांगणार! पाकिस्तानला टप्प्यात घेरण्याची तयारी

Ujani Dam Solapur: उजनी धरणच ICU मध्ये, पाणी विषारी, धरणाकाठचे रहिवासी भयंकर आजाराने ग्रस्त, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा भिगवणमध्ये जाऊन दावा!

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड

मोठी बातमी ! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे… लवकरच मोठा ट्विस्ट!