शिवशाही बस उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात (Gondia Shivshahi Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस (Gondia Bus Accident) उलटली. या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी घेतली परिस्थितीची माहिती-
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
स्मार्ट लोगों की स्मार्ट पसंद
Xiaomi SMART Google TV
Emi फक्त 1199/-😯
आणि मिळावा *4999/- चा साउंड बार 🆓🆓*
आजच भेट द्या….
*एस एस मोबाईल*
पत्ता: राजाराम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, जुन्या स्टेट बँकेच्या समोर, सांगोला.
फोन: 8600232373 / 9960846262