Rohit Sharma : IPL 2025 च्या सीजनमध्ये रोहित शर्माचा संघर्ष सुरु आहे. मागच्या दोन सीजनमध्ये सुद्धा रोहितला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. रोहितच हे प्रदर्शन पाहून माजी कर्णधाराने अत्यंत जिव्हारी लागणारी टीका त्याच्यावर केली आहे.
रोहित शर्मा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये असतो, तेव्हा त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. पण तीच निळी जर्सी जेव्हा मुंबई इंडियन्सची असते, तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा आटतात.
1 / 10
आयपीएल 2025 मध्ये हेच पहायला मिळतय. रोहित शर्मा या सीजनच्या पहिल्या तिन्ही सामन्यात पूर्णपणे फेल ठरलाय. रोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खात उघडता आलं नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 8 धावा केल्या. केकेआर विरुद्ध 13 रन्स केल्या.
2 / 10
रोहित शर्माला आंद्रे रसेलने आऊट केलं. महत्त्वाच म्हणजे रोहित शर्मा शॉर्ट पिच बॉलवर आऊट झाला. रोहित शर्माच हे असं प्रदर्शन पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक मोठ वक्तव्य केलं आहे.
3 / 10
‘रोहितच्या जागी दुसरा खेळाडू असता, तर तो टीममध्ये नसता’ असं मायकल वॉनने म्हटलं आहे. इंग्लंडच माजी कर्णधार मायकल वॉनने कठोर शब्दात टीका केली आहे.
4 / 10
त्याचं नाव रोहित शर्मा नसतं, तर कदाचित त्याला टीमच्या बाहेर केलं असतं. वॉन क्रिकबज शो मध्ये म्हणाला की, “जर तो राष्ट्रीय संघाच कर्णधार बनण्यास सर्वात चांगला आहे, मग तो आपल्या फ्रेंचायजीच्या टीमचा कर्णधार का नाही?”
5 / 10
“तो संपूर्ण सीजन खेळणार. पण तुम्ही त्याचे आकडे पाहिलेत, तर त्यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते, कॅप्टन असल्यामुळे सरासरी प्रदर्शन सुद्धा चालून जातं”
6 / 10
“जर त्याचं नाव रोहित शर्मा नसतं, तर तो कदाचित टीममध्ये नसता. हे आकडे कुठल्याही खेळाडूसाठी पुरेसे नाहीत. रोहितच प्रदर्शन टीमसाठी मोठी समस्या आहे” अशी टीका मायकल वॉनने केली.
7 / 10
रोहितने फक्त आठवेळा आयपीएलमध्ये 50 + स्कोर केला आहे. एकच सेंच्युरी झळकवली आहे. “मी नेहमी विचार करतो, तो भारताचा कॅप्टन आहे, मग MI ची कॅप्टनशिप का करत नाही? हे मला समजत नाही. तो भारताचा शानदार कर्णधार आहे. मागच्या काही वर्षात वनडे, T20 मध्ये त्याने चांगलं काम केलय.
8 / 10
रोहित शर्मा ओपनर म्हणून कसा फ्लॉप ठरलाय ते या आकड्यांमधून समजून घ्या. रोहित शर्माने आयपीएल 2023 पासून आतापर्यंत ओपनर म्हणून 770 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 24.83 ची आहे.
9 / 10
दुसऱ्या कुठल्याही ओपनरपेक्षा ही कमी सरासरी आहे. रोहित सारख्या खेळाडूसाठी हे आकडे एक मोठा मुद्दा आहेत. आता आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यात रोहितच्या प्रदर्शनावर सगळ्यांच लक्ष असेल.