मिलिंद नार्वेकर सर्वांदेखत म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Politics : वाघाची शिकार तस्करी  करणाऱ्याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.

Milind Narvkar मुंबई : वाघाची शिकार तस्करी (Tiger Poachers)  करणाऱ्याला दिसता क्षणी ठोका, आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvkar) यांनी केली आहे. या मागणी करत नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind)e  यांना उद्देशून मिश्किल शेरा ही लागवला आहे. शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका, आपल्या दोघांना यामध्ये मिळून काहीतर करावं लागेल, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले आहे.

वाघांच्या तस्करीसंदर्भात आसामच्या धर्तीवर कठोर कायदा करा

येथेच आपण कितीतरी वाघ बसले आहोत असं म्हणतो. आता याच आपल्या वाघांनी एकत्र येऊन या वाघांना वाचण्यासाठी काहीतरी करावं, असं म्हणत आपला प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मांडला. या प्रकारे आसाममध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी गोळ्या घालायचा हा कायदा करण्यात आला. अगदी तसंच कायदा राज्यात सुद्धा करावा लागेल, राज्यात सुद्धा वाघाची तस्करी आणि शिकार करणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांनी दिली.

Shinde Sena considering Uddhav aide Milind Narvekar for Mumbai seat |  Mumbai news - Hindustan Times

राज्यात वाघाची तस्करी सुरू असून टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीची तस्करी करण्यासाठी तिच्या गळ्यात तारेचा फास अडकल्याची घटना ताजी असताना पवणार येथे पिकेडी टी-33च्या वाघिणीच्या गळ्यातही असाच फास आढळला. त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा कायदा करता येईल का? याचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणी आता शासन स्थरावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी सक्रिय

म्यानमार मार्गे गेल्या चार महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वनविभागातील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली. वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱ्या मिझोराम येथील जमखानकप या आरोपीच्या अटकेनंतर हा धक्कादायक खुलासा झाला. तब्बल एक दशकानंतर मध्य भारतातील वाघ पुन्हा एकदा शिकाऱ्यांच्या रडारवर आले आहे आणि या शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या कत्तली केल्याचं आता उघड होत आहे. याच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता  विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvkar) यांनी सभागृहात लक्षवेधी मांडत सरकारचे लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा 

पंजाब किंग्स समोर गुजरात टायटन्स चं आव्हान, कोण देणार विजयी सलामी?

 

Eknath Shinde

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon