टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

मोठी बातमी समोर येत आहे, बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका- आणि पुतण्याची लढत पाहायला मिळू शकते. युगेंद्र पवार यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल उभारण्याचे संकेत दिले आहेत.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या लढत पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्यांची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार? 

अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभं करण्याचे संकेत युगेंद्र पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माळेगाव साखर कारखाना, सोमेश्वर साखर कारखाना किंवा एकूण उसाच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आज नाही तर गेल्या चाळीस, पन्नास वर्षांपासून पवार साहेब यांचं या क्षेत्रात योगदान आहे. जर पवार साहेब आपल्या पाठिमागे आहेत. तिथे आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि जर आपण तो साखर कारखाना वाचू शकतो तर मग निवडणूक लढवायला काय हरकत आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे आता युगेंद्र पवार हे माळेगाव साखर कारखाना आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत पाहायला मिळू शकते.

विधानसभेत पराभव 

युगेंद्र पवार यांनी गेल्यावेळी अजित पवार यांच्याविरोधात बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्याची ही लढत मोठी चुरशीची ठरली, मात्र या निवडणुकीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला. दरम्यान आता पुन्हा एकदा काका-पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती