IML 2025 : इंडिया मास्टर्सची फायनलमध्ये एन्ट्री, ऑस्ट्रेलियावर 94 धावांनी धमाकेदार विजय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

India Masters vs Australia Masters 1st Semi-Final Match Result : इंडिया मास्टर्सने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्सने ही कामगिरी केली.

सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्स टीमने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. इंडियाने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी 20 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया मास्टर्सवर 94 धावांनी विजय मिळवला. इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सला विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया मास्टर्सला 18.1 ओव्हरमध्ये 126 धावांवर गुंडाळलं आणि फायनलमध्ये धडक दिली. आता इंडिया मास्टर्स रविवारी 16 मार्चला श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यातील विजेता संघाविरुद्ध अंतिम फेरीत भिडणार आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियासाठी बेन कटिंग याने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर शॉन मार्श, विकेटकीपर बेन डंक आणि नॅथन रीअर्डन या तिघांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. झेवियर डोहर्टी याने 10 धावा केल्या. तर इतरांपैकी काहींना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठू दिला नाही. इंडियाकडून शाहबाज नदीम याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. इरफान पठाण आणि विनय कुमार या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर स्टूअर्ट बिन्नी आणि पवन नेगी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

इंडिया मास्टर्सची बॅटिंग

त्याआधी इंडिया मास्टर्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. इंडियासाठी युवराज सिंह याने सर्वाधिक धावा केल्या. युवराजने 30 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 1 फोरसह 59 रन्स केल्या. कर्णधार सचिन तेंडुलकर याने 42, स्टु्अर्ट बिन्नीने 36, युसूफ पठाण याने 23, इरफान पठाण याने नाबाद 19 आणि पवन नेगी याने 14 धावा केल्या.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon