10 मार्च 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प
-
10 हजार वर्षांतील सर्वात बोगस बजेट: ‘मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’, उद्धव ठाकरे यांची बजेटवर टीका
-
विधानभवानात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही, फडणवीस-ठाकरेंचं मात्र हस्तांदोलन!
-
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली, 12 मार्चपर्यंत पैसे जमा होणार
-
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?: CM फडणवीस म्हणाले – जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून मिळतील
-
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणन मंत्र्यांचा निर्णय; आमदारांच्या सुचनांचा प्लॅन घेऊन सहकारमंत्री अमित शाहांना भेटणार
-
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, रवींद्र धंगेकर ‘हाता’ची साथ सोडणार; लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार
-
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू…; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
-
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
-
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक: आंबेगावमधील शिवसृष्टीस 50 कोटीचा वाढीव निधी; पानिपत, आग्र्यामध्ये स्मारक उभारणार
-
सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर: मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
-
महाराष्ट्रात 5 वर्षांत 71 लाख रोजगार: नव्या औद्योगिक धोरणातून 50 लाख रोजगार तयार होणार; अर्थसंकल्पातून अजित पवारांचा आशावाद
-
अर्थसंकल्पात एसटीला वाटण्याच्या अक्षता: एसटीची झोळी रिकामीच; गाड्या परिवर्तित करण्याची योजना जुनीच- श्रीरंग बरगे यांचा आरोप
-
फरार ललित मोदीचे वानुआतूचे नागरिकत्व रद्द: पंतप्रधान जोथम यांनी पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले
-
निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वन डेतून आत्ताच निवृत्त होणार नाही
ही बातमी वाचा: