टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्र आता थांबणार नाही! 9 महिन्यांत परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले, 1 लाख 34 हजार कोटींचा खजिना राज्यात

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024-25 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये राज्यात विक्रमी गुंतवणूक आल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून दिली आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात 1 लाख 39 हजार 434 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन केला असून पुढील काळात राज्याची घोडदौड अशीच कायम राहील असं त्यांनी म्हटलं  आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट जशीच्या तशी

गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात !

केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.

2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. असे करताना महायुती सरकारने आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.

आणखी गुंतवणूक वाढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये  2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन  तिमाहींच्या आकडेवारीचा दाखला दिला आहे. राज्यातील पहिल्या तीन तिमाहींच्या आकडेवारीची माहिती रिपोर्टमध्ये असून अजून एका तिमाहीचे आकडे नंतर येतील. म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात जी परकीय गुंतवणूक येईल त्यामध्ये देखील वाढ होईल.

राज्यातील गुंतवणुकीत वाढ सुरुच

महाराष्ट्रात 2022-23 या वर्षात 1 लाख 18  हजार 422 कोटी परकीय गुंतवणूक आली होती. तर,2023-24 मध्ये  125101  कोटी रुपयांची गुंतवणूक ली होती.

दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. अमेरिकेतील उद्योजक एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं शोरुम देखील महाराष्ट्रात सुरु होणार आहे.

 

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raju Shetti Sadabhau Khot : राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत यांची ‘चाय पे चर्चा’, ऊसदर आंदोलनाचं निमित्त, एकाच टेबलवर गप्पाचा फड

Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय

100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी

NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

NEET Exam Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सर्वात मोठी कारवाई, मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; 18 जून रोजी होणार मतदान, पाहा A टू Z माहिती