sports

ब्रेकिंग! ना रोहित, ना कोहली, ना शमी

क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनल सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सर्वच सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघ वर्ल्डकप उंचावण्यासाठी आतुर झाला आहे. भारताचे सगळेच खेळाडू फार्मात आहेत. विशेषतः रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, बुमराह यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात ती मीडियाचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास भारतीय क्रीडा रसिकांना आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टीम इंडियातील गेम चेंजर खेळाडूचे नाव सांगितले आहे.
या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, गौतमने श्रेयस अय्यरला मॅचविनर खेळाडू असे म्हटले आहे.

गौतम म्हणाला की, माझ्यासाठी श्रेयस सर्वात मोठा गेमचेंजर खेळाडू आहे. तो दुखापतग्रस्त होता, त्यानंतर संघात संधीच्या शोधात होता. सेमी फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात त्याने ७० चेंडूत शतक पूर्ण केले. जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि झम्पा गोलंदाजी करतील, त्यावेळी श्रेयस मोलाची भूमिका बजावणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात श्रेयसने महत्वाची खेळी केली. शुभमन गिलने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडल्यानंतर श्रेयस फलंदाजीला आला होता. त्याने विराटला साथ देत आक्रमक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७० चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार ठोकले.

 

Related Articles

Back to top button