top news

माफी नाही, दिलगिरी नाही, संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षकचं’

आजवर मी छत्रपती शिवाजी महापुरुषांबाबत बोलताना कुठल्याही महापुरुषाबद्दल चुकीचे बोललो नाही. मला भाजपने विरोधी पक्षनेते पद दिले नाही, मला राष्ट्रवादीचे विधानसभेचे ५३ आमदार आहेत, त्यांनी हे पद दिले आहे. मला पदावर ठेवायचे की नाही, हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना ती मागणी करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून सुरु असलेल्या वादावर पडदा पाडला.
दोन दिवसांपासून भाजपने त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आदेश दिले की, तुम्ही पवार यांच्याविरोधात आंदोलन करा आणि पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपने विरोधी पक्षनेते पद दिले नाही, मला राष्ट्रवादीचे विधानसभेचे ५३ आमदार आहेत. त्यांनी हे पद दिले आहे. त्यामुळे मला पदावर ठेवायचे की नाही, हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना मागणी करण्याचा अधिकार नाही, असेही पवारांनी भाजपला ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button