टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

52 वर्षीय राहुल गांधींना लग्नासाठी हवी ‘अशी’ मुलगी…

Follow Us:
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेनिमित्त कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास करत आहेत. राहुल यांच्या या प्रवासादरम्यान अनेक किस्से, घटना समोर येत आहेत. यातच आता राहुल यांच्या लग्नाचा मुद्दा चांगला गाजतोय.
राहुल यांनी पहिल्यांदाच लग्नासंदर्भात आपले मन मोकळं केलं आहे. आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या गुणांचा मिलाफ असलेली मुलगी मला लग्नासाठी हवी आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. एका युट्युब चॅनलच्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.
राहुल यांना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माझी आजी माझ्या आयुष्यातील प्रेमाची व्यक्ती होती. ती माझ्यासाठी दुसरी आई होती. ज्यावर इंदिरा गांधींचे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का? असे दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, ज्यावर ते म्हणाले की, हा एक चांगला प्रश्न आहे, मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजीचे आणि आईचे गुण एकत्रित असले पाहिजे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा