entertainment

धक्कादायक ; शूटींगदरम्यान सेटवरच 20 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्मानं शूटींगदरम्यान सेटवरच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कलाक्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
टुनिशाचं नायगाव येथे शूटिंग सुरू होते. सेटवर असलेल्या मेकअप रूममध्ये तिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मेकअप रूममधून टुनिशा खूप वेळ बाहेर न आल्यानं तिच्या सहकाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती समोर आली आहे.
सेटवरील लोकांनी तिला दवाखान्यातही नेलं होतं. परंतु डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केलं. टुनिशानं मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. परंतु तिच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button