टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आधी मतदान ; मगच लग्न

Follow Us:

धुळ्यात एका नववधूने लग्न करण्याआधी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे नवरीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. सीमा कुंभार असे नववधूचे नाव असून त्यांनी धुळे जिल्ह्यातल्या फागणे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले आहे.
सीमा यांनी लग्नाच्या पोशाखात मतदान केले आहे. 

आधी लग्न लोकशाहीचे त्यानंतर माझे, असे म्हणत त्यांनी इतरांनाही जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. लग्नासाठी नवरा मंडपात वाट पाहत असतानाच नववधू सीमा यांनी मतदानाला जाण्याचा निर्णय घेतल्याने गावातील लोकांनी त्यांचे स्वागत केले आहे. सीमा यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला असून मतदान केल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now