टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महामोर्च्याला अद्याप परवानगी नाही, आघाडीत चिंता; मुख्यमंत्री म्हणाले…

Follow Us:
महाविकास आघाडीतर्फे १७ तारखेला महामोर्चा काढला जाणार आहे. मात्र पोलीस विभागाकडून आद्यपही परवानगी मिळालेली नाही. यावरून महाविकास आघाडीने शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फिक्र मत करो, सब की परमिशन मिलेंगी. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. सरकार त्याच्यात कोणताही खोळंबा घालणार नाही.
दरम्यान सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
आज महामोर्च्यांच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पवार  यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now