सुषमा अंधारे यांनी मागितली जाहीर माफी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

मी कोणाच्याही श्रद्धे आड नाही, पण तरी राजकीय सूडबुद्धीतून मला विरोध केला जातोय, मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत, असा आरोप करत माझ्यामुळे जर संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं म्हणत ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. 

अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केल होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले, त्यानंतर माझ्या आईने 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं, पण ते विधान कापलं गेलं, असंही अंधारे म्हणाल्या.
वारकऱ्यांकडून माझी प्रेतयात्रा काढली गेली. इतिहास साक्षी आहे की, या देशात अनेक समाज सुधारकांच्या प्रेत यात्रा काढण्यात आल्या. त्यात माझीही एवढी दाखल घेतली गेली याचा आनंद, पण ती दखल राजकीय सूडबुद्धीने घेतली जातेय याचा खेद आहे. कारण वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, अस आवाहनही अंधारे यांनी केलं.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon