क्राईम
बागलकोटमध्ये श्रद्धा वालकर सारखे भयंकर हत्याकांड

कर्नाटकमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बागलकोटमध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांची लोखंडी रॉडने हत्या करून त्यांच्या शरीराचे ३२ तुकडे केले. त्यानंतर आरोपीने वडिलांच्या शरीराचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकले. हत्येचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी विठला कुलाली याने रागाच्या भरात वडील परशुराम (५३) यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीच्या मनाला पाझर फुटला नाही. त्याने जन्मदात्या वडिलांच्या शरीराचे ३२ तुकडे केले व ते तुकडे शेतातील खुल्या बोअरवेलमध्ये टाकले.

परशुराम नेहमी दारूच्या नशेत आपल्या दोन मुलांपैकी विठला याला शिव्या देत होता. परशुराम यांची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. मागील मंगळवारी विठलाला वडिलांनी शिव्या दिल्याने राग आला. त्यानंतर त्याने वार करून हत्या केली.