maharashtra
बेहिशेबी मालमत्ता ; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव आणि त्यांच्या कुटुंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी मुंबई हायकोर्टात सांगितले की, उद्धव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गौरी भिडे यांनी उद्धव कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर राज्य सरकारने स्वत:च कोर्टापुढे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेची हायकोर्टाकडून नोंद घेण्यात आली.