top news
ब्रेकिंग! हिमाचलमध्ये भाजपला तगडा झटका
गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये टक्कर सुरू आहे.
हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काँग्रेसनं 39 जागा तर भाजपनं 26 जागा काबीज केल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हिमाचल प्रदेशची आतापर्यंतची मतमोजणी पाहता भाजप अडचणीत आल्याचं दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील एक नेत्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विनोद तावडे सध्या शिमल्यामध्ये पोहचले आहेत. तावडे आणि मंगल पांडेही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता भाजपच्या या नेत्यांमध्ये काय चर्चा होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.