शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. शिवतारे हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची भूमिका म्हणजे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.
48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं ? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका शिवतारेंनी केली आहे.
राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घर रस्त्यावर आली त्या मराठी बांधवांची काळजी करावी, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.





WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.54 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.55 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.59 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.03.05 PM










