छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी राज्यपाल बदलण्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून रस्त्यावर उतरून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
मराठावाडा विद्यापाठातील सोहळ्यात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तुलना केली. यानंतर आता पहिल्यांदाच गडकरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांनी एक ३० सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो. आमच्या आई वडिलांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे.





WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.54 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.55 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.59 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.03.05 PM










