टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजितदादा आठ दिवसांनी मीडियासमोर

Follow Us:
  • विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मावळ दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्याभरात ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यावरून उलट सुलट चर्चा रंगली होती. दरम्यान, आठवडाभर पवार कुठे होते, यावर त्यांनी उत्तर दिलं.
    शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर झाले तेव्हा शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपचारानंतर हजर राहिले होते. पण अजितदादा हे अनुपस्थित असल्यानं चर्चा झाली. अजितदादा नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. 
तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिल्या. पण अजितदादा यांनी मौन बाळगले होते. आता अजितदादा हे आठवड्याभराने सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिले. अजितदादा म्हणाले की, मी पाच दिवस आजारी होतो. खोकला होता आणि प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू होत्या.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now