टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!

On: November 14, 2026 1:19 PM
Follow Us:

Supriya Sule on NCP Merger: अजित पवार गटातून कुणाचाही प्रस्ताव आलेला नाही, फोन, मेसेज काहीही आलेलं नाही. माझा भाऊ गेला त्यावेळी सगळा विषय संपला आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. गाठीभेटी, चर्चा, बैठका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विलिनीकरणासंदर्भात (Supriya Sule on NCP Merger) वेगवेगळे दावे करण्यात येत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे, वक्तव्ये करण्यात येत होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आणि एनडीएसोबत सत्तेत (Supriya Sule on NCP Merger)  जाण्याच्या चर्चांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद (Supriya Sule on NCP Merger) घेऊन सविस्तरपणे भाष्य केलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, एनडीए सोबत जाण्याची चर्चा नाही. जिथे चर्चा नाही तिथ कॉमा, फुलस्टॉप विषय येत नाही. एसए लिहिला नाही तर त्याबाबत का बोलायचं? अशा शब्दात विलीनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लावला आहे.(Supriya Sule on NCP Merger)

Supriya Sule on NCP Merger: माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विलीनीकरणाच्या चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप झाला, ज्या दिवशी संघटनेतील पदाधिकारी आणि माझा अजितदादा यांच्याशी चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ पण तुम्ही दाखवले. माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती. ज्या दिवशी भाऊ गेला त्या दिवशी विलीनीकरणाला फुल स्टॉप झाला. आमच्याकडून एकही स्टेटमेंटनंतर केलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे स्टेटमेंट आली त्याला आम्ही काऊंटर केलेलं नाही. जे आमचं पुढे जायचं ठरलं होतं, ते अजितदादांसोबत ठरलं होतं. काही गोष्टी हृदयातूनही होतात, विलीनीकरणाच्या चर्चांवर आज जे काही आहे ते प्रश्न विचारुन टाका, आज काय ते होऊन जाऊ द्या. यापुढे मी विलिनिकरणावर बोलणार नाही. या चर्चांवरुन मला कंटाळा आला आहे, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत होण्याचा विषयचं येत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार गटातून कुणाचाही प्रस्ताव आलेला नाही, फोन, मेसेज काहीही आलेलं नाही. माझा भाऊ गेला त्यावेळी सगळा विषय संपला आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.(Supriya Sule on NCP Merger)

Supriya Sule on NCP Merger: . राष्ट्रवादीकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही

त्याचबरोबर माझा भाऊ गेला त्यानंतर या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम दिलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियांवर काहीही बोलत नाही. माझं आणि माझ्या भावाचं नात जवळच होतं तो ओलावा कायम राहील असंही सुळेंनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now