टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; १५०० की ३०००?

On: October 31, 2026 1:54 PM
Follow Us:

Ladki Bahin Yojana September Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याचाहप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आला असून ‘लाडकी बहीण योजनेतील’ सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जात होता. मात्र आता लाडक्या बहिणींच्या या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे, या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले असताना, आता या महिन्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निधी वितरणाची प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने लाडकी बहीण योजनेतील सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे दिला होता. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे जमा होताच पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्रित मिळतील अशी आशा होती. पण लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबरच्या हप्त्याचे १५०० रुपये मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होत असल्यामुळे याचा दिवाळीच्या सणात घरखर्चात हातभार लागत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now