टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे

On: October 30, 2026 12:32 PM
Follow Us:

Navnath ban and Nilesh Rane: भाजपचे नवनाथ बन आणि शिवसेना नेत्यांमध्ये कालपासून वाद सुरु आहे. रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांच्यावर सडकून टीका केली होती.

Navnath ban and Nilesh Rane: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटला आहे. राज्यातील पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक (MLC Election Result 2026) झाली होती. यामध्ये महाविकास आघाडीने पदवीधरच्या 3 पैकी 3 जागा जिंकल्या, सत्ताधारी महायुतीने शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागा जिंकल्या. परंतु पाचपैकी फक्त दोन जागा मिळाल्याने महायुतीत सध्या अंतर्गत वाद पेटला आहे. पुण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने साथ न दिल्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेच्या भूमिकेने महायुतीच्या गणिताला सुरुंग लावल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला होता. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. त्यांनी नवनाथ बन यांना प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावला होता. या सगळ्या वादात आता निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. (Maharashtra Politics news)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती, असे निलेश राणे यांनी म्हटले. या टीकेनंतर आता नवनाथ बन राणे यांना प्रत्युत्तर देणार का, हे बघावे लागेल.

Shivsena Vs BJP: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका – एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेला विसंवाद वाढवू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे. निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.  युतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घ्या. महायुती म्हणून काम करताना झालेल्या चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून महायुती समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.तूर्तास शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये. विसंवाद टाळून एकजुटीने पुन्हा कामाला लागण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now