टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोलापुरातून चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा आदेश

On: September 28, 2026 11:31 PM
Follow Us:

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यात चारा आणि मुरघासाची वाहतूक व विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात सध्या उपलब्ध चारा सुमारे 120 दिवस पुरेल इतकाच असल्याचे प्रशासनाच्या आढाव्यात समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातून चारा इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आरटीओ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील चारा बाहेर गेल्यास स्थानिक पशुधनासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वाचा असल्याचेही काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा