टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

नीला विखे पाटील यांचा राधाकृष्ण विखे पाटलांबाबत मोठा खुलासा; म्हणाल्या, “मागील 10-12 वर्षांत आमचा संपर्क नाही”

On: September 25, 2026 11:47 AM
Follow Us:

अहिल्यानगरमधील विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून येत आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. 349 सदस्यांच्या स्वीडिश संसदेत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची महाराष्ट्रातही चर्चा झाली.

नीला विखे पाटील या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

मात्र, त्यानंतर नीला विखे पाटील यांनी काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्यासोबतच्या संबंधांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

पीटीआयशी बोलताना नीला विखे पाटील यांनी सांगितले की, मागील 10 ते 12 वर्षांपासून त्यांचा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे त्यांनी म्हटले. भारतात त्यांचे येणे-जाणे सुरू असले तरी या काळात त्यांची त्यांच्याशी भेट झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वीडनमध्ये निवडून आल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नीला विखे पाटील यांनी म्हटले. त्यांचे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकारण तसेच राजकीय विचारसरणी वेगळी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना खासदार झाल्यानंतर फोन करून अभिनंदन केले, असेही नीला यांनी सांगितले. मात्र, त्यापलीकडे आपले कोणतेही कौटुंबिक किंवा राजकीय संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नीला विखे पाटील स्वीडनमधील ग्रीन पार्टीशी संबंधित असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही याच पक्षातून झाल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा