टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

Follow Us:

Girls Death By Snake Byte : मृत तीनही विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रात्रीच्यावेळी ही घटना घडली आहे. आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेची प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे.

Girls Death By Snake Byte : रात्री झोपेत सर्पदंश, आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

: गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे ही घटना घडली आहे. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली आहे. जपतलाई येथे ही अनुदानित निवासी आश्रम शाळा आहे. रात्री विद्यार्थिनी खोलीत झोपलेल्या असताना सापाने दंश केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तीनही विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं आहे. रात्रीच्यावेळी ही घटना घडली आहे. आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेची प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. पोलीस पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी तीन मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची माहिती आहे. शेकडो विद्यार्थिनी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात. या घटनेमुळे त्यांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे. सर्पदंशाची ही घटना रात्री घडली. त्यानंतर वेळेत त्या मुलींना उपचार मिळाले का? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

रात्री किती वाजण्याच्या सुमारास घडली घटना?

विद्यार्थिनी गाढ झोपेत असताना रात्री दोन ते अडीजच्या दरम्यान ही घटना घडली. या बद्दल समजल्यानंतर विद्यार्थिनीना लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे धानोरा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दीपिका लकडा, सुष्मिता मंडल या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दीपिका लकडा सहावी तर सुष्मिता मंडल इयत्ता आठवीत शिकत होती. अनु कोरेटी या तिसऱ्या विद्यार्थिनीचा गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या अन्य तीन विद्यार्थिनीवर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपिका मदवी इयत्ता पाचवीत, कविता किरंगा सहावीत आणि समृद्धी नैताम इयत्ता आठवीत शिकत आहे. समृद्धी नैतमची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 

सुनावणीपूर्वी ‘सुप्रीम’ बैठक, एकनाथ शिंदे यांची सेनेच्या मंत्र्यांसोबत तासाभरापासून खलबतं, पक्ष चिन्हं गोठवणार?

Explained: ‘शिवसेना’ अन् धनुष्यबाण कोणाचं? ठाकरे की शिंदे? आजचा दिवस महत्त्वाचा; 2023 पासून सुप्रीम कोर्टात काय काय झालं?