टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत ३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

Follow Us:

सोलापूर : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat), सोलापूर यांच्या पुढाकाराने सारथी युथ फाउंडेशन, सोलापूर आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन दि. ३ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर येथे करण्यात आले आहे.

या अभियानाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे तसेच कला, साहित्य आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून ‘व्यसनमुक्त भारत – विकसित भारत’ हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा आहे.

स्पर्धांमध्ये समूह गायन (लोकगीत), समूह नृत्य, नुक्कड नाटक, वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री आणि रील मेकिंग या आठ स्पर्धांचा समावेश असून १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी MY Bharat Portal वर नोंदणी करणे आवश्यक असून, प्रसिद्ध करण्यात आलेला QR Code स्कॅन करून अथवा Google Form द्वारे नोंदणी करता येणार आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट विजेत्यांची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत विषयाशी सुसंगतता, मौलिकता, सर्जनशीलता, कलात्मक सादरीकरण आणि संदेशाची प्रभावीता या निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना पुढील स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), नेहरू युवा केंद्राशी संलग्न युवक तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील सर्व युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त भारताच्या जनआंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत (MY Bharat), सोलापूरचे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी केले आहे.

  स्पर्धेची नोंदणी, नियमावली व अधिक माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला QR Code स्कॅन करून Google Form भरावा अथवा जिल्हा युवा कार्यालय, मेरा युवा भारत (MY Bharat), सोलापूर येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now