टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Eknath Shinde : दोन्ही हाताला सलाईनच्या पट्ट्या… एकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग; तीन मंत्र्यांना दिले मोठे आदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच महाराष्ट्रातील भीषण पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सलाईन लावूनही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन मुंबई, कोकण आणि रायगडमधील पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे आणि बचावकार्य गतीने करण्याचे आदेश त्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिले.

Eknath Shinde : दोन्ही हाताला सलाईनच्या पट्ट्या... एकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग; तीन मंत्र्यांना दिले मोठे आदेश

गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात तर पावसाने अक्षरश: कहर उडवला आहे. त्यामुळे दाणादाण उडाली आहे. कोकणात तर नद्यांची धोक्याची पातळी ओलांडायला सुरुवात केली आहे. रायगडमध्येही पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयात ॲडमिट असूनही शिंदे पावसाचा आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सूचना करत आहेत. नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसैनिक, मंत्री आणि आमदार तसेच खासदारांना कामाला लावत आहेत. आजही त्यांनी सकाळीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि सर्वांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून मुंबईसहित कोकणातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणी नागरिकांना मदत केली जात आहे का? पक्षाचा कोणता नेता फिल्डवर आहे? वगैरे माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अडचणीत असलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवा. घटनास्थळी जा. लोकांना भेटा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती मदत करा, आदी सूचना शिंदे यांनी नेत्यांना दिल्याचं समजतं.

गोगावले, सामंत, कदम यांना आदेश

तसेच रायगडमधील मंत्री भरत गोगावले, योगेश कदम आणि उदय सामंत यांना महाड आणि रायगडमधील पाणी साठलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. तसेच रायगडमध्ये आपत्तीच्या ठिकाणी भेट देण्याचे आदेशही त्यांनी दिले. नागरिकांना मदत करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

शिंदेंच्या पालिका आयुक्तांना सूचना

तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून शिंदेंनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत रुग्णालयातूनच मिटिंग केली. यावेळी त्यांनी मुंबईतील पावसाचा आढावा घेतला. सर्व अधिकार्यांना फिल्डवर उतरून काम करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झाड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये म्हणून धोकादायक झाडे हटवण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मॅनहोलवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यााशिवाय मुंबईतील दरड कोसळण्याच्या ठिकाणांचाही आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

हाताला सलाईन

एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे दगदग आणि घशाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचा रुग्णालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मिटिंग करत असतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोत शिंदे यांच्या दोन्ही हाताला सलाईनच्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत.

गोगावले रायगडच्या दिशेने

नागोठणे परिसरामध्ये दरड कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले तातडीने रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्या ठिकाणचे मदत कार्य आणि परिसरातील पूर परिस्थितीचा आढावा गोगावले घेणार आहेत. तसेच घटनास्थळी गेल्यावर सर्व माहिती घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपूर्ण माहिती देणार आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! गौण खनिजावरील रॉयल्टी माफ, शेती करा सुपीक, अर्ज करावा कसा?

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?