टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rain Update : महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा, जुलैच्या..

On: June 29, 2026 12:15 PM
Follow Us:

Rain Update : राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. मात्र, म्हणावा तेवढा समाधानकारक पाऊस कोसळताना दिसला नाही. यादरम्यानच आता पावसाबद्दल मोठा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात पाऊस कधी जोरदार कोसळणार याबाबत मोठी माहिती पुढे आली.

Rain Update : महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा, जुलैच्या..

2 जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रात तब्बल 15 दिवस मॉन्सून रेंगाळला. यंदा राज्यात मॉन्सूनचा पाऊस उशीरा दाखल झाला. आता कुठे सर्वदूर पावसाला सुरूवात झाली. काल रात्री अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच आता मोठा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात 1 जुलैपासून अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यात पुढील 3 दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाला. मात्र, पेरण्या अजून खोळबंल्या आहेत. शेतकऱ्यांकडून पेरण्याची सर्व तयारी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात पाऊस अजून काही म्हणावा तसा पडला नाही. यादरम्यानच आता पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

1 जुलैपासून अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर वाढेल. जळगाव जिल्ह्यात उशिरा का असेना, पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, पुढील 3 दिवस जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

29, 30 जून व 2 जुलै रोजी जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 जुलै रोजी हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात 1 जुलैपासून समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा पावसावर एल निनोचे संकट आहे.

एल निनोमुळे पाऊस कमी पडू शकतो, असा अंदाज आहे. आसाममध्ये पावसाने थैमान घातले. अनेक जिल्ह्यात पूर आला. जनजीवनच लोकांचे विस्कळीत झाले. पुढील काही दिवसांसाठी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. धरणातील पाणी पातळीही वाढू शकते. सध्या अनेक भागात पाणी टंचाईची मोठी समस्या आहे. सुरूवातीला संपूर्ण जून महिनाच कोरडा जाण्याचा अंदाज होता. मात्र, जूनच्या अखेरच्य आठवड्यात मॉन्सून राज्यात दाखल झाला. अनेक भागात मॉन्सूनचा पाऊस कोसळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now