टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Omraje: श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले तिरुपती बालाजीचे देवदर्शन

On: June 26, 2026 7:55 PM
Follow Us:

Omraje Nimbalkar : खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले, त्यासाठी 11 किलोमीटर पायी चालत प्रवास केला आहे.

अकोला/मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर फुटलेल्या सर्वच 6 खासदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगितली. त्यामध्ये, खासदार ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या टीकेचा मोठा सामना करावा लागला. मात्र, मी विकासासाठी, माझ्या मतदारसंघातील लोकांना दिलेल्या आश्वासनाच्यापूर्तीसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याचे ओमराजे यांनी सांगितले. आता, केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनी एकत्रित तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या दर्शनासाठी दोघांना तब्बल 11 किमी पायपीट केल्याची माहिती आहे.

खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले, त्यासाठी 11 किलोमीटर पायी चालत प्रवास केला आहे. या दर्शनाचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटो आणि व्हिडिओ ‘एबीपी माझा’च्या हाती आले आहेत. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांचं संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नाव असल्याने दोघांच्याही या देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तिरुपती ते तिरूमला डोंगरापर्यंत 11 किलोमीटर चालत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. गुरुवार काल रात्री श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील, खासदार ओमराजे यांचे बंधू हेही त्यांच्यासोबत होते, अशी माहिती आहे. या सर्वांनी आज सकाळीच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी विजयवाडा येथील कन्यका देवीचे दर्शन घेत देवीलाही साकडे घातले. खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा प्रवास केला.

चंद्रहार पाटील यांची पोस्ट

पैलवान चंद्रहार पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून, फोटोही शेअर केले आहेत. 25 जून रोजी तिरुपती बालाजी (आंध्रप्रदेश) येथे दर्शनासाठी रात्री 10 ते 2.30 वाजेपर्यंत 3800 पायऱ्या चढून जवळ पास 11 किलोमीटरचे अंतर चालत पार केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आम्ही सर्वांनी चालत जाऊन पहाटे दर्शन घेतले, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.

तिरुपतीला नेमकं काय साकडं?

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत येत असताना, ऑपरेशन टायगर सुरू असताना सहा खासदारांपैकी चार खासदार ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यामध्ये, नॉट रिचेबल असताना खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात होते. मात्र, वडिल पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर, त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेशही झाला. आता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ओमराजेंना सोबत घेत तिरुपती आणि कन्याका देवीला नेमके काय साकडे घातले? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सर्व प्रवासाचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत.

हेही वाचा

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now