टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात किंवा शाळेच्या डब्यात तेच ठरविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही पनीर बेसन पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक

सुट्टी संपल्यानंतर मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर सर्वच पालकांना पडललेला एकमेव प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्यात काय बनवावे. नेहमीच चपाती भाजी, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी बऱ्याचदा मुलांना विकतचे पदार्थ आणून खाण्यास दिले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट पनीर बेसनाचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. पनीर खायला सगळ्यांचं आवडते. वजन कमी करताना आहारात पनीरचे सेवन करावे. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बेसन आणि पनीर एकत्र बनवलेले पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त हेल्दी आहेत. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत पॅनकेक अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया पनीर बेसन पॅनकेक बनवण्याची रेसिपी

साहित्य:

  • बेसन
  • पनीर
  • जिऱ्याची पावडर
  • कांदा
  • धणे पावडर
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • बेकिंग सोडा
  • तेल

कृती:

  • पनीर बेसन पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यतेनुसार पाणी घालून मिक्स करा. पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक केलेले पनीर आणि बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर बेसन पॅनकेक. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now