टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार

Legislative Council BJP Strength: वरिष्ठ सभागृहात भाजपची ताकद वाढली आहे. 73 पैकी 35 आमदार एकट्या बीजेपीचे आहे. तर बहुमताच्या काठावर असणाऱ्या भाजपचे संख्याबळ त्या एका खेळीमुळे वाढणार आहे. भाजपला आता मित्र पक्षाचीही गरज भासणार नाही.

विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार

Legislative Council BJP Strength: विधान परिषदेत आता भाजपकडेच हुकुमी एक्का असेल. वरिष्ठ सभागृहात एकूण 78 जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर 73 आमदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत. पाच जणांची राज्यपाल नियुक्ती बाकी आहेत. त्यातील तीन जागा भाजपच्या वाट्यास येऊ शकतात. त्यामुळे विधान परिषदेत भाजपकडेच बहुमत असेल. विधान परिषदेत भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल. कोणतेही विधेयक मंजूर करणे आता भाजपसाठी अवघड नसेल.

भाजपकडे असतील 35 आमदार

राज्यपाल नियुक्त 12 आमदार असतात. यामधील सात जणांची अगोदरच नियुक्ती झालेली आहे. पाच जणांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यात तीन आमदार भाजपचे तर उर्वरीत प्रत्येकी एक आमदार शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा असेल. भाजपचे आज 35 आमदार आहेत. हे तीन आमदार त्यात जोडल्या गेल्यावर भाजपच्या आमदारांचा एकूण आकडा 38 इतका होईल. विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढेल.

संख्याबळ वाढवण्याची अजून मोठी संधी

या वर्षाच्या अखेरीस पदवीधर आणि शिक्षक अशा पाच मतदारसंघांमधील निवडणूक होणार आहे. हे एकूण पाच मतदारसंघ आहेत. त्यात आता जुने वाचपे काढण्याची संधी भाजपकडे आहे. तर संख्याबळ वाढवण्याची ही मोठी संधी मानली जाते. यातील तीन जागा जरी भाजपच्या वाट्याला आल्या तर भाजपच्या आमदारांची संख्या 40 अथवा त्यापेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे भाजपला संख्याबळ वाढवण्याची मोठी संधी आहे. विधान परिषदेत पाशवी बहुमताची एक मोठी संधी भाजपकडे आहे.

विरोधी पक्ष नेतेपदी कोणीच नाही?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद अजूनही रिक्त आहेत. काँग्रेस आणि उद्धव सेनेत त्यासाठी रस्सीखेच सुरू असली तरी पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण देत हे पद अजूनही रिक्त आहे. सालाबादाप्रमाणे विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या सरकारी चहापानावर बहिष्कार घातला. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी, विरोधी पक्ष नेते पद भरल्या जात नसल्यावरून नाराजी व्यक्त केलेली आहे.

विधान परिषदेचे असे आहे संख्याबळ

भाजप – ३५

शिंदे सेना – १२

राष्ट्रवादी अजित पवार – १०

ठाकरे गट – ६

काँग्रेस – ५

राष्ट्रवादी (शप) – २

अपक्ष – ३

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Shivsena MP Opration Tiger Vikas Nidhi: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या फुटलेल्या खासदारांची बुरखा टराटरा फाडणारी माहिती

Uddhav Thackeray Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित

Eknath Shinde : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं

ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली

सातारा-सांगलीत भाजपला सर्वात मोठा धक्का, उमेदवार विजयी, पण… मोठा गेम काय झाला? धक्कादायक माहिती समोर

Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, तो व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?