टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सर्वात मोठी बातमी… 6 खासदारांचा आजच शिंदेसेनेत प्रवेश, फुल्ल प्लानिंग, टाइम टेबल समोर, ठाकरेंना मोठा झटका

शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आज दुपारी 3 वाजता 6 खासदार अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश करतील. या पक्षबदलनाट्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामुळे ठाकरेंच्या गटाला मोठा फटका बसणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत आहेत.

सर्वात मोठी बातमी… 6 खासदारांचा आजच शिंदेसेनेत प्रवेश, फुल्ल प्लानिंग, टाइम टेबल समोर, ठाकरेंना मोठा झटका

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंड केल्याने पक्षात फूट पडली. गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या या राजकीय नाट्यात आज सर्वात मोठी घडामोड घडणार आहे. आज दुपारी 3 वाजता सर्व 6 खासदार हे मुंबईत अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्याआधी, साधारण 11 वाजता ते याबद्दलचं ऑफिशियल लेटर आणि फोटो जाहीर करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी दिलेले संमती पत्र आणि सर्व खासदारांचे एकत्र फोटो, व्हिडीओ आज प्रसिद्ध होणार आहेत. आजच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हे सर्व खासदार आज दुपारी 1 वाजता कलिना एअरपोर्टवर लँड होतील, त्यानंतर 2 वाजता त्यांची एक मीटिंग होईल आणि शेवटी दुपारी ४ वाजता मुंबईत मीडियासोबत त्यांची प्रेस कॉन्फरन्स होईल.

आज मोठा धमाका

काल संध्याकाळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला आणि घडामोडींना वेग आला. गेल्या आठवड्यापासून रंगलेल्या या ऑपरेशन टागयर नाट्याचा महत्वाचा प्रवेश आज पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या ६ जणांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे आज जाहीर होणार आहेत. दुपारी ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश होईल. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील अष्टीकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे.

त्याआधी ते आज दिल्लीहून मुंबईत येतील, 2 वाजता मीटिंग झाल्यानंतर दुपारी या सहा खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश होईल. त्यानंतर या सर्व खासदारांची एक प्रेस कॉन्फरन्स होणार असून ते आपापली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

ऑपरेशन टायगर

गेल्या आठवड्यापासून ऑपरेशन टायगर रंगलं होतं. 16 जून रोजी ठाकरेंचे सहा खासदार अचानक दिल्लीला रावाना झाले. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले आणि रात्रभर घडामोडींना वेग आला. त्यानंतर ऑपरेशन टायगरअंतर्गत अनेक घडामोडी घडल्या. 6 खासदारांच्या फुटीच्या चर्चा होताच ठाकरे गटातही खळबळ माजली. दुसऱ्याच दिवशी खासदारांना व्हीप बजावत दिल्लीतील संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले . मात्र ठाकरे शिवसेनेचे अवघे 3 खासदार या बैठकीस उपस्थित होते. मात्र, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे, हे सहाही खासदार व्हीपला न जुमानता बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यानंतर त्यांच्या फुटीचा निर्णय स्पष्ट झाला.

19 जूनला शिवसेनच्या वर्धापन दिनाचे दोन मेळाव झाले. ठाकरे गटाच्य सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना गद्दार संबोधलं. तर शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंचे नेतृत्व यावर बोट दाखव जोरदार टीका केली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार