राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येताच लागू करण्यात येणार आहे.

1/8

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येताच लागू करण्यात येणार आहे.
2/8

शासनाने केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी व शर्ती लादण्यात आलेल्या असल्याने शेतकरी संघटनांकडून या कर्जमाफीला विरोध करत, सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे.
3/8

सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं, आता शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हेही आंदोलन करत आहेत.
4/8

वाशिमध्ये शेतकरी संघटनेकडून सुरू असलेल्या आंदोलनावेळी सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्याची स्वत:ची लाख मोलाची दुचाकी भररस्त्यात पेटवली
5/8

वाशिममध्ये सरसकट कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्याने स्वतःची दुचाकी पेटवून संताप व्यक्त केला
6/8

वाशिमच्या अडोळी येथे एका शेतकऱ्याने स्वत:च्या दुचाकीला आग लावून दिली, बुलढाणा इथं रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमाफी आंदोलनाच्या समर्थानात ही दुचाकी पेटवली.
7/8

सतीश इडोळे असं दुचाकी पेटवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, हीच शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.
8/8

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होईल, यापुढे नेतेमंडळी व अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवायला मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशाराही आंदोलकांनी दिला















